औरंगाबाद: सध्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू असून, या स्पर्धेतील सामन्यात सट्टा लावणारी मसटोरी गँगफ शहरात सक्रिय झाली आहे. हॉटेलमध्ये गुप्त पद्धतीने गटा-गटात सट्टा लावला जात असल्याने पोलिसांना या गँगपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.
सध्या सगळीकडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा फिव्हर पाहायला मिळत आहे. जगात कुठे नाहीत, इतके क्रिकेटचे फॅन्स भारतात आहेत. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात असून, उपांत्य व अंतिम फेरीचे सामने बाकी आहेत. या स्पर्धेतील सामन्यात सट्टा लावणारी मसटोरी गँगफ सध्या शहरात सक्रिय झाली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील अनेक हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये क्रिकेटचे सामने मोठमोठ्या स्क्रीनवर दाखविलेे जात आहेत. याचाच फायदा उचलत मसटोरी गँगफ सक्रिय झाली आहे. ही गँग अशा हॉटेल्सची निवड करते ज्या हॉटेलमध्ये क्रिकेटचे सामने टीव्ही किंवा स्क्रीनवर दाखविले जातात. मग या हॉटेल्समध्ये ते क्रिकेटवरसट्टा लावणार्या ग्राहकांना घेऊन जातात व तेथेच सामन्यावर सट्टा लावला जातो. बघणार्यांना असे वाटते की, जणू क्रिकेटवेड्या मित्रांचा हा गट असावा. मात्र, असे काही नाही. हे सर्वजण वेगवेगळ्या भागातील असतात. अशा गुप्त पद्धतीने शहरातील अनेक ठिकाणी लहान-मोठ्या स्वरूपात क्रिकेटवर सट्टा सुरू आहे. मात्र, वैयक्तिक गटात हा खेळ सुरू असल्याने पोलिसांना या सटोरी गँगपर्यंत पोहोचण्यास अडचण येत आहे.











